पुणे : रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटणाऱ्या तडीपार गुंडासह दोन साथीदारांना लष्कर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी छोट्या उर्फ अभिषेक शिवाजी आल्टे (वय २३ रा. बाबाजान चौक, लष्कर) , अमर विशाल खरात (वय १९ रा. साईबाबा मंदिरासमोर, लष्कर), जयेश गणेश भिसे (वय १९, रा. कासेवाडी, भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार लातूरहून पुण्यात आले होते. लष्कर भागातून ते रविवारी (१५ डिसेंबर) निघाले होते. त्यावेळी तडीपार गुंड छोट्या, त्याचे साथीदार अमर, जयेश यांनी त्यांना अडवले. धमकावून त्यांच्याकडील मोबाइल संच चोरून तिघे जण पसार झाले. घाबरलेल्या प्रवाशाने लष्कर पोलिसांकडे तक्रार दिली.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमधील बांगलादेशी, रोहिंग्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर पोलिसांनी तपास करुन तिघांना पकडले. आरोपींकडून दोन दुचाकी आणि मोबाइल संच जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, उपनिरीक्षक प्रदीप पवार, राहुल घाडगे, ज्योती कुटे, पोलीस कर्मचारी महेश कदम, सोमनाथ बनसोडे, संदीप उकिर्डे, रमेश चौधर यांनी ही कामगिरी केली.