पुणे : सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे एटीएममध्ये शिरून रोकड चोरीचा प्रयत्न करणारा चोरटा गजाआड झाला. रविवार पेठेत फडके हौद चौकातील एका एटीएम केंद्रात ही घटना घडली. संतोष लक्ष्मण रौत (वय ३४, रा. पाटील गल्ली, बेळगाव, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत सुरक्षारक्षक पंकजकुमार यादव याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा : पिंपरीतील ड्रग्ज प्रकरणी ‘त्या’ पोलीस उपनिरीक्षकाला अटक, आणखी काही जण तपासात निष्पन्न होण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडके हौद चौकात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम केंद्र आहे. आरोपी संतोष रौत सकाळी सातच्या सुमारास एटीएम केंद्रात पैसे काढण्याच्या बहाण्याने शिरला. एटीएमची तोडफोड करून त्याने रोकड चोरीचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षक यादव याच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने रौतला पकडले आणि त्वरित या घटनेची माहिती पोलिसांना दिली. रौतला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली असून, तोडफोडीत एटीएमचे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. पोलीस हवालदार गणेश दळवी तपास करत आहेत.