पुणे : मेट्रो मार्गिकेच्या कामामुळे सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्त्याने आचार्य आनंदऋषीजी चैाकातून (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. विद्यापीठ चौकातील कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून या भागात वाहतूक बदल केले आहेत. सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्त्याने विद्यापीठ चाैकातून उजवीकडे वळून वाहनचालक विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून विद्यापीठाकडे जातात. विद्यापीठ चौकात शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे खांब टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागात कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांनी विद्यापीठ चौकातून उजवीकडे वळून विद्यापीठाकडे जाणाऱ्या वाहनांना मनाई केली आहे. वाहनचालकांनी गणेशखिंड रस्त्याने सरळ जाऊन चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या परिसरातील मिलेनियम गेटमधून विद्यापीठात प्रवेश करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.

हेही वाचा : सीरम इन्स्टिट्यूटला पाण्याचा तुटवडा… जाणून घ्या कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाणेर आणि ओैंध रस्त्याने येणाऱ्या वाहनचालकांनी विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या परिसरातील मिलिनियम गेटचा वापर करावा. पोलिसांनी विद्यापीठ चौकात केलेले वाहतूक बदल प्रायोगिक तत्त्वावर केले आहे. याबाबतच्या सूचना लेखी स्वरुपात वाहतूक शाखेच्या येरवड्यातील पोलीस उपायुक्त कार्यालयात पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.