पुणे : पुणे- सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गात दोन दुचाकींची समोरसमोर धडक झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. अपघातात दोन दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : पुणे : बावधन भागातील इमारतीत मोठी आग, स्टुडिओतील साहित्य जळून खाक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सातारा रस्त्यावरील रांका ज्वेलर्सजवळ रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गातून दोन दुचाकीस्वार भरधाव वेगाने निघाले होते. रांका ज्वेलर्स पेढीसमोर दुचाकींची समाेरासमोर धडक झाली. अपघातात दुचाकीस्वारांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली. सहकारनगर पोलीस ठाण्यात अपघाताच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.