पुणे : उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभा निवडणुकीचा उमेदवार जाहीर केल्यानंतर संजोग वाघेरे यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. गेली दहा वर्षे झाली, मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा होता. आगामी निवडणुकीत देखील त्या ठिकाणी गद्दारांचा पराभव करून पुन्हा शिवसेनेचा खासदार मी होईल, अशी आशा संजोग वाघेरे यांनी व्यक्त केली आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अद्यापही मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. परंतु, महायुतीचा उमेदवार हा कमळाच्या चिन्हावर लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच, मावळ लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या नावावर अद्याप तरी शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यांची देखील उमेदवरीवरून धाकधूक वाढली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : मोठी नोकर भरती! पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ‘या’ पदासाठी मागविले अर्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजोग वाघेरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी उरणच्या सभेत उमेदवारी जाहीर केली. पुढे ते म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा राहिलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा खासदार म्हणून मी निवडून येईल, अशी मला खात्री आहे. पुढे ते म्हणाले, विरोधक कमळाच्या चिन्हावर लढल्यास उलट निवडणूक सोपी होईल. कारण भाजपच्या विरोधात सुप्त लाट आहे. याचा फायदा मला होईल. मतदान करताना ते शिवसेनेला करतील. महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला गेल्याने नागरिक नाराज आहेत. महागाईने नागरिक त्रस्त आहेत, असे वाघेरे म्हणाले.