पुणे : बालाजीनगरमध्ये मुसळधार पावसामुळे सीमाभिंत कोसळल्याने मोटारीचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. धनकवडी, कात्रज, आंबेगाव भागात शुक्रवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. धनकवडीतील बालाजीनगर परिसरात नाल्याजवळ असलेल्या सद्गुरु सोसायटीची सीमाभिंत कोसळली.
हेही वाचा : महावितरणमधील अपंग कर्मचारी महिलेचा विनयभंग प्रकरणात अभियंत्यासह तिघांवर गुन्हा
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
सीमाभिंतीशेजारी मोटार लावण्यात आली. सीमाभिंत मोटारीवर कोसळल्याने मोटारीचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.