लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: कोयता गॅंगने वारजे माळवाडी आणि तळजाई भागात वाहनाची तोडफोड करण्याच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा टोळक्याने दहशत मजविल्याचा प्रकार घडला. टोळक्याने भर रस्त्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
कोयता गॅंगने पुण्यात उच्छाद मांडला आहे. कोयता गॅंगचे वाढते प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली असली, तरीही त्यांच्याकडून दहशत माजवण्याचे प्रकार घडतच आहेत. सहकारनगर भागात मोटारीच्या टपावर बसून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आल्याची घटना घडली आहे.