पुणे : अमली पदार्थांच्या व्यसनापासून युवकांनी दूर राहण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात समुपदेशकाचे एक अतिरिक्त पद (किमान व्हिजिटिंग) निर्माण करण्याचा शासन गांभीर्याने विचार करीत असल्याची माहिती उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कार्टून्स कंबाईनच्या सहकार्याने सोमेश्वर फाउंडेशनतर्फे आयोजित जनजागृती कार्यक्रमात पाटील बोलत होते. फाउंडेशनचे अध्यक्ष, माजी नगरसेवक चंद्रशेखर निम्हण या वेळी उपस्थित होते. चारूहास पंडित, योगेंद्र भगत, विश्वास सूर्यवंशी, अतुल पुरंदरे, धनराज गरड, शरयू फरकांडे, लहू काळे, अश्विनी राणे या व्यंगचित्रकारांनी ‘पुणेकरांनो, एकत्र येऊन अमली पदार्थांच्या विरोधात लढू या’ असा संदेश देणारी व्यंगचित्रे काढली.

हेही वाचा >>>पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील ‘एल थ्री’ बारच्या मालकासह दोघांविरुद्ध आणखी एक गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाटील म्हणाले, अमली पदार्थ सेवनाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. ७० लाख लोकसंख्येचे शहर हे जवळजवळ कामातून गेले, अशी प्रतिमा निर्माण होत आहे. त्यामुळे पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. येथे उद्योगांची संख्या मोठी असून, आरोग्य सेवा उत्तम आहेत. वेगाने विकसित होणारे देशातील आठव्या क्रमांकाचे शहर ही प्रतिमा व्यसनामुळे पूर्ण वाया गेलेले शहर अशी चुकीची होत आहे. त्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, नागरिकांना दक्षता पथकांमध्ये सहभागी करून घेतले पाहिजे, पबसंदर्भात नियमावली करून त्याच्या अंमलबजावणीसाठी पुणेकरांनी एकत्र आले पाहिजे, या विषयात कोणीही राजकारण करू नये.