पिंपरी : समाजमाध्यमातील ‘इंस्टाग्राम’वरून मैत्री झालेल्या तरुणीने तरुणाला संदेश करून भेटायला बोलाविले. त्यानंतर तरुणाचा मोबाइल फोन घेऊन तरुणी पळून गेल्याची घटना पिंपरीत घडली.

याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी तरुणीने फिर्यादी तरुणाला इंस्टाग्रामवर संदेश पाठविला. त्याला पिंपरीत भेटायला बोलाविले. पिंपरीत दोघांची भेट झाली.

हेही वाचा…आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा समाजाने निवडणुका लढवाव्या; प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

तिथे तरुणीने तरुणाकडे त्याचा फोन मागितला. मात्र फोन देण्यास तरुणाने नकार दिला. त्यावरून तरुणीने ‘तू तुझा मोबाईल दे नाही तर मी आरडाओरडा करून लोकांना तू माझी छेड काढतो असे सांगेल’. माझ्या मित्रांना बोलावून घेऊन तुला मारायला सांगेल’ अशी धमकी दिली. तरुणाच्या खिशातून ४५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन तरुणीने जबरदस्तीने काढून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.