पुणे : खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारार्थ विनापरवानगी कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत भरारी पथकातील समन्वय अधिकारी राहुल साळुंखे यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – नेता कोणाला म्हणायचे?

हेही वाचा – पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रोहन ज्ञानोबा धावडे, संजय उर्फ बाबू दोडके, अजय पोळ (तिघे रा. वारजे माळवाडी) यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. धावडे, दोडके, पोळ यांनी चांदणी लाॅन येथे रविवारी (१० नोव्हेंबर) सचिन दोडके यांच्या प्रचारासाठी विनापरवानगी सभा, तसेच स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन केले. नागरिकांना समाज माध्यमातून संदेश पाठविले. ‘वारजेकरांचा निर्धार, सचिनभाऊ दोडकेच आमदार’, असे फलक कार्यक्रमस्थळी लावले. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडी तपास करत आहेत. खडकवासला मतदारसंघात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी यापूर्वी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.