पुणे : कर्जबाजारी झाल्याने हुबेहुब दिसणाऱ्या व्यक्तीचा खून करुन स्वत:चा खून झाल्याचा बनाव रचल्या प्रकरणी न्यायालयाने एकाला जन्मठेप आणि सव्वातीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी याबाबतचे आदेश दिले. विठ्ठल तुकाराम चव्हाण (वय ४५ रा. बारामती, जि. पुणे) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. खून प्रकरणात एकाची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. चव्हाण कर्जबाजारी झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चव्हाण आणि साथीदाराने चव्हाण सारख्या दिसणाऱ्या विनायक उर्फ पिंटू ताराचंद तळेकर (वय ३२, रा. कोडीत खुर्द, ता. पुरंदर, जि. पुणे) याला दारु पाजली. चव्हाण आणि साथीदाराने मोटारीतून त्याला कात्रज घाट, कोंढणपूरमार्गे खेड शिवापूर परिसरातील मरिआई घाटात नेले. मोटारीत तळेकरला मारहाण केली. तळेकर याच्या अंगावर तसेच मोटारीवर पेट्रोल ओतून पेटवून देण्यात आली. सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. आर. गौड यांनी या प्रकरणाचा तपास केला. आरोपी चव्हाण आणि साथीदारास अटक करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life imprisonment for the accused killed person faked murder pune print news rbk 25 ysh
First published on: 20-01-2023 at 15:34 IST