पिंपरी- चिंचवड: पर्यटननगरी लोणावळ्यात गेल्या २४ तासात ८८ मि.मी पाऊस कोसळला आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप कमी आहे. २०२५ मध्ये आजतागायत ५ हजार ९७७ मि.मी पाऊस कोसळला आहे. आणखी काही दिवस पाऊस कोसळत राहिल्यास गेल्या वर्षीचा रेकॉर्ड तुटण्याची शक्यता आहे.
पर्यटननगरी लोणावळ्यात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. गेल्या २४ तासात ८८ मि.मी पाऊस कोसळला आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी १५५ मि.मी पाऊस कोसळला होता. अस असलं तरी गेल्या वर्षीचा एकूण पावसाचा रेकॉर्ड तुटण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एकूण ६ हजार १३ मि.मी पावसाची नोंद आहे. २०२५ म्हणजे यावर्षी (आत्तापर्यंत) एकुण पावसाची आकडेवारी ५ हजार ९७७ मि.मी आहे.
शनिवार आणि रविवार वीकेंड ला पर्यटकांची गर्दी होते आहे. लोणावळ्यात पर्यटक पावसाचा आनंद लुटत आहेत. दुसरीकडे मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. कित्येक वर्षानंतर पावसाने रौद्ररूप धारण केलं आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. शेतकऱ्यांना पाऊस नकोसा झाला आहे. शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे.