पिंपरी – चिंचवड : मोशी येथील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जगात सर्वात उंच असल्याची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. मोशी येथील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र येथे संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येत आहे. पुतळ्याच काम अंतिम टप्प्यात आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून हा पुतळा उभारण्यात येत आहे.

स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण ला ऐतिहासिक मानवंदना देण्यात आली. तीन हजार ढोल, एक हजार ताशा आणि पाचशे ध्वजांच्या गजरात मानवंदना देण्यात आली. यावेळी मर्दानी खेळांनी लक्ष वेधले. चिखली येथील संतपीठाच्या माध्यमातून कीर्तन सादर करण्यात आले. बाल शिवभक्तांनी शिवगर्जनाने लक्ष वेधले. प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी शिव गीत गायले. शिव गीतांवर शिवभक्तांनी एकच ताल धरला होता. मानवंदना बघण्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी नेमकं कसा आहे?

छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा ब्राँझ धातू पासून उभारण्यात येत आहे. पुतळ्याची उंची तब्बल शंभर फूट आहे. पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेकडून पुतळा उभारण्यासाठी तब्बल ४८ कोटी खर्च केले जात आहेत. याच परिसरात मोशी येथे शंभू सृष्टी साकारली जात आहे.