कोणी कितीही एकत्र आलं तरी महाविकास आघाडीच आगामी निवडणुका जिंकणार असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिवसेना (शिंदे गटाच्या) नेत्यांनी कितीही पोपटपंची केली तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. उलट, शिंदे गटाच विसर्जन होईल अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

हेही वाचा >>> पुणे: अमली पदार्थ विक्री प्रकरणात महिलेसह दोघांना अटक

विनायक राऊत म्हणाले, महाविकास आघाडी आगामी प्रत्येक निवडणूक जिंकणारच. कोणी कितीही एकत्र येऊ द्या. महाविकास आघाडीच पुढे असेल. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्या माध्यमातून आम्ही निवडणुका लढणार आहोत. पुढे ते म्हणाले की, शिंदे गटाचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. त्यांनी किती पोपटपंची करू द्या. भाजप मंत्रिमंडळ विस्तार करू देणार नाही.

हेही वाचा >>> पुणे: चंदननगर भागात सोसायटीच्या आवारातील रोहित्राला आग 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदे गटाच्या विसर्जनाची सुरुवात झाली आहे. पुढे ते म्हणाले की, गद्दारी करणाऱ्या नेत्यांना पुन्हा पक्षाचे दरवाजे उघडणार नाहीत. त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे बंदच राहतील. त्यांना भाजप धडा शिकवीन अशा गद्दारी आणि बेइमानी करणाऱ्या व्यक्तींना आम्ही कधीच जवळ करणार नाही. असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं अस विनायक राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांनाच पुढे घेऊन जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.