पुणे : राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. त्यात पाचवीचा निकाल २२.३१ टक्के, तर आठवीचा निकाल १६.६० टक्के लागला असून, पाचवीचे १६ हजार ५३७ विद्यार्थी आणि आठवीचे १४ हजार ७१४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा >>> सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १३३ सहायक प्राध्यापकांची कंत्राटी भरती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारी रोजी राज्यभरात घेण्यात आली होती. त्यात पाचवीच्या ५ लाख ३२ हजार ८७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ५ लाख १४ हजार १३१ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ५३७ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. तर आठवीच्या ३ लाख ६७ हजार ८०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या लाख ५६ हजार ३२ विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ७१५ विद्यार्थी पात्र ठरले. अंतरिम निकाल २९ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आक्षेप-हरकतींची प्रक्रिया पूर्ण करून गुरुवारी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांची यादी, जिल्हानिहाय यादी http://www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.