संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सोमवारी (१२ जून) शहरात दाखल होणार आहे. पालखी साेहळ्यानिमित्त शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून यंदा लाइव्ह लोकेशन सुविधेचा वापर करण्यात येणार आहेश्री ज्ञानेश्वरमहाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराममहाराज यांच्या पालखीचे आगमन, तसेच पालखी मार्गस्थ होत असताना शहरातील रस्ते बंद करण्यात येतात. वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पालखी मार्गावरील प्रमुख चौक आणि रस्ते टप्प्याटप्प्याने वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे.

लाइव्ह लोकेशन सुविधेमुळे पालखी सोहळ्याची माहिती नागरिकांना उपलब्ध होईल, तसेच वाहतुकीचे नियोजनही करणे शक्य होणार आहे. श्री ज्ञानेश्वरमहाराज आणि श्री तुकाराममहाराज यांच्या पालख्यांचे सोमवारी (१२ जून) शहरात आगमन होणार आहे. सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. diversion.punepolice.gov.in या लाइव्ह लोकेशनमुळे रस्ते खूप वेळ बंद राहणार नाहीत. पालखी मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यातील भाविकांच्या गर्दीचे नियोजन, अनुचित घटना रोखण्यासाठी बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2023 पिंपरी: संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी उद्योगनगरीत दाखल

वाहतुकीस बंद असणारे रस्ते- कंसात पर्यायी मार्ग

गणेशखिंड रस्ता (रेंजहिल्स चौक ते संचेती रुग्णालय) पर्यायी मार्ग- रेंजहिल्स-खडकी पोलीस ठाणे, पोल्ट्री चौक, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि रेंजहिल्स, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता

फर्ग्युसन रस्ता (खंडुजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक) पर्यायी मार्ग- कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल्स

शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक) पर्यायी मार्ग- कुंभार वेस, मालधक्का चौक, आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल, बंडगार्डन रस्ता

टिळक चौक ते वीर चापेकर चौक, पर्यायी मार्ग- शास्त्री रस्ता, म्हात्रे पूल

लक्ष्मी रस्ता (बेलबाग चौक ते टिळक चौक), पर्यायी मार्ग- शिवाजी रस्ता, हिराबाग टिळक रस्ता, शास्त्री रस्ता

पालखी मार्गावर ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

पालखी सोहळा सोमवारी (१२ जून) शहरात दाखल होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी वारकरी, तसेच भाविकांची मोठी गर्दी होणार असून शहरात सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पालखी मार्गावर ड्रोन कॅमेरे, तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

हेही वाचा >>>VIDEO: माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यादरम्यान आळंदीत पोलिसांकडून वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी रस्ते बंद

नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिर येथे श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असणार आहे. भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. या भागातील रस्ते सोमवारी (१२ जून) दुपारी १२ नंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. पालखी सोहळा बुधवारी (१४ जून) सकाळी शहरातून मार्गस्थ होणार आहे.