पिंपरी: उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एकावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये घडली.नागेश बाबू राठोड (वय ३७, रा. इंदिरानगर, चिंचवड स्टेशन) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तेजस उर्फ बबलू दिगंबर शिंदे (वय २९) आणि दीपक राम मोरे (वय ४८, दोघे रा. इंदिरानगर, चिंचवड स्टेशन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागेश हे साई उद्यानाजवळ आले होते. त्यावेळी तेजस आणि दीपक यांना नागेश यांनी उसने दिलेले पैसे परत मागितले. या रागातून तसेच दीपक याच्या बहिणीला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून घर मिळण्यास आडकाठी का करतो ? असे म्हणत तुला आज बघून घेतो, अशी धमकी देत दीपकने नागेश यांना पकडून ठेवले. तर, तेजसने कोयत्याने नागेश यांच्या डोक्यात वार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. वार चुकवण्यासाठी नागेश यांनी डोक्यावर हात ठेवल्यामुळे पाच ते सहा वार त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ व तीन वार पाठीवर पडले. आरोपींनी हातातील कोयता हवेत फिरून जमलेल्या लोकांमध्ये दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.

हेही वाचा >>>आणखी दोन दिवस पाऊस; जाणून घ्या, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला दिलेले इशारे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयत्याने मारहाण केल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शुल्लक कारणावरून कोयत्याने मारहाण केली जाते. हवेत कोयता फिरवून भाईगिरी केली जाते. परिसरात दहशत पसरविण्यासाठी कोयता हवेत फिरविला जातो. कोयत्याने वाहनांची तोडफोड केली जाते. त्यामुळे शहरात कोयता गँग पुन्हा डोकेवर काढताना दिसत आहे.