पिंपरी- चिंचवड : मित्राने मित्राची डोक्यात गोळी झाडून हत्या केली आहे. ही घटना आळंदी दिघी रोडवर घडली आहे. नितीन गिलबिले चा जागीच मृत्यू झाला आहे. संशयित आरोपी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर चा शोध दिघी पोलीस घेत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहा च्या सुमारास मयत नितीन गिलबिले, अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे आळंदी दिघी रस्त्याच्या कडेला चारचाकी गाडी लावून आत बसले होते. ते एकमेकांसोबत गप्पा मारत होते. पैकी, अमित पठारे आणि विक्रांतने त्याच्या जवळील पिस्तुल काढून नितीन गिलबिलेच्या डोक्यात गोळी झाडली.

यात नितीन चा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली असून संशयित आरोपी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर पसार झाले असून त्यांचा शोध दिघी पोलीस घेत आहेत. घटनास्थळी दिघी पोलीस आणि गुन्हे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी धाव घेतली होती. अद्याप हत्येच कारण समजू शकलेले नाही. अधिक पोलीस तपास करत आहेत.