पुणे: चालू वर्षाच्या अखेरच्या महिन्याचा पूर्वार्ध संपल्यानंतर आता नव्या वर्षाची, २०२४ ची उत्सुकता निर्माण झाली आहे. २०२४ हे वर्ष लीप वर्ष असल्याने २९ दिवसांच्या फेब्रुवारीमध्ये पाच गुरुवार येत असून, या शतकात पहिल्यांदाच ५३ सोमवार, ५३ मंगळवार येत आहेत. त्यामुळे २०२४ हे वर्ष काही बाबतीत वेगळे ठरणार आहे.

गणित अभ्यासक दीनानाथ गोरे यांनी याबाबत माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसह २०२४ मध्ये देशात आणि जगात काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. त्यात लोकसभा आणि काही राज्यांतील विधानसभा निवडणुका, अमेरिकेतील निवडणुका, टी २० विश्वचषक, ऑलिम्पिक २०२४ आदींचा समावेश असल्याचे आहे.

Growing digital divide in education
शिक्षणातली वाढती डिजिटल दरी!
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत

हेही वाचा… विनायक मेटे यांची विमाननगरमधील सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न; मेटेंच्या मुलाची आत्याविरुद्ध तक्रार

२०२४ हे वर्ष १९६८ आणि १९९६ या वर्षांप्रमाणेच आहे. त्यामुळे एकाच वाराला येणाऱ्या आणि तारखेने मिळणाऱ्या १ मे, २ ऑक्टोबर २५ डिसेंबर या तीन सुट्या बुधवारी आहेत. नव्या वर्षाची सुरुवात (१ जानेवारी) सोमवारी आणि शेवट (३१ डिसेंबर) मंगळवारी होणार आहे. पारसी नववर्षाची सुटी आणि देशाचा स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट) या शतकात पहिल्यांदाच एका दिवशी आहे. २००५ या वर्षाच्या तिथी (प्रतिपदा, चतुर्थी, पौर्णिमा) १९ वर्षांनी २०२४ मध्ये येत आहेत. त्यामुळेॆ गुढीपाडवा ९ एप्रिल रोजी, बुद्धपौर्णिमा २३ मे रोजी, गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर रोजी, गुरुनानक जयंती १५ नोव्हेंबरला आहे.

हेही वाचा… पुणे: शरीरसंबंधास विरोध केल्याने महिलेचा खून; दोघे गजाआड

पुढील वर्षी महत्त्वाच्या सणांची रविवारला जोडून १३ सुट्या मिळणार आहेत. त्यात २५ मार्चला होळी, ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थी, १२ ऑक्टोबरला दसरा, १ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन, २ नोव्हेंबरला दिवाळी पाडवा, ३ नोव्हेंबरला भाऊबीज आहे. तर प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) शुक्रवारी, गुडफ्रायडे २९ मार्चला आहे, अशी माहिती दीनानथ गोरे यांनी दिली. २०५१ आणि २०८० मध्येही २०२४ या वर्षाचीच दिनदर्शिका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.