मराठा आरक्षणावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज खासदार संभाजीराजे भोसले यांनी आज परखड भूमिका घेत, राज्य सरकारला ६ जूनपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“६ तारखेला अवकाश आहे ना? आज २८ तारीख किती आहे आणखी ९ दिवसांत खूप काही होऊ शकतं. ९ दिवसांत चर्चा होईल, काही मार्ग निघेल. पण काहीकाहींना .. संभाजीराजेंना नाही.. पण काहींना त्यात राजकारण करून स्वतःचं हीतचं साधायचं असेल तर त्यामध्ये… काही पक्षांनी जाहीर केलं., कुणी आंदोलन केलं की आमचा पाठींबा आहे. अरे कशासाठी आंदोलन काय? त्याची जरा माहिती घेणार की नाही?” असं उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हणलाे आहेत.

“…अन्यथा कोविड वगैरे काही बघणार नाही, हा संभाजीराजे सर्वात पुढे असेल!”

तर, “येत्या ६ जूनपर्यंत जर राज्य सरकारने योग्य ती कार्यवाही केली नाही आणि निश्चित असा प्लॅन ऑफ अॅक्शन ठरवला नाही, तर आम्ही कोविड-बिविड काहीही बघणार नाही”, असं थेट आव्हानच संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारला दिलं आहे.

“आम्हालाही आक्रमक होता येतं, किती वर्ष या वर्गाचा वापर करून घेणार?”, मराठा आरक्षणावरून संभाजीराजे कडाडले!

गेल्या काही दिवसांपासून खासदार संभाजीराजे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला असून प्रमुख पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यामध्ये आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे.

आषाढीच्या पायी वारी संदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार –

दरम्यान, आषाढी निमित्त पाया पालखी सोहळ्याला परवानगी देण्यासंदर्भात आता कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय़ हा मुख्यमंत्र्यांचाच असेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. अजित पवार व गृहमंत्री वळसे पाटील यांच्यासोबत वारकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली, यावेळी पायी वारीला परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. करोनाचे सर्व नियम पाळत मर्यादित स्वरूपात पायी वारी काढू पण ९ जूनपर्यंत निर्णय सरकारने निर्णय जाहीर करावं, असं वारकऱ्यांचं म्हणणं आहे.