पुणे : पुण्यातील मावळमध्ये पवना धरणग्रस्तांनी मोर्चा काढला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. पवनानगर बाजारापेठेतून मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकरांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला तेव्हा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नका. गोळ्या घाला पण शेतकऱ्यांची अडवणूक करू नका, असे म्हणत मोर्चा पवना डॅमच्या गेटमधून आत नेला. मोर्चेकऱ्यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा बंद केल्याचे सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणावर आज धरणग्रस्तांनी तीव्र मोर्चा काढला. या मोर्चात मावळचे आमदार सुनील शेळके आणि धरणग्रस्त शेतकरी सहभागी झाले. पवनानगर बाजारपेठेतून घोषणाबाजी करत मोर्चा पवना धरणावर पोहोचला. मोर्चाची कल्पना असल्याने पिंपरी- चिंचवड पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. मोर्चासह पोलीस चालत होते.

हेही वाचा – चूक महापालिकेची, भुर्दंड मिळकतधारकांना! ; सवलतीसाठी पीटी-३ अर्ज भरण्याची सक्ती

पवना धरणावर मोर्चा जाताच पोलिसांनी मोर्चेकरांना अडवण्याचा प्रयत्न केला. “आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नका, शेतकऱ्यांना अडवू नका, आम्हाला गोळ्या घाला असे आमदार सुनील शेळके यांनी म्हणत पोलिसांचा विरोध झुगारून पवना धरण परिसरात मोर्चेकऱ्यांना पुढे घेऊन गेले. गेल्या अनेक वर्षांपासून पवना धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. चार एकर जमीन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नोकरी मिळावी, अशा मागण्या घेऊन धरणग्रस्तांनी मोर्चा काढला आहे. या मोर्चाकडे आणि मागण्यांकडे राज्यसरकार कसे पहाते हे बघावे लागेल.

धरणग्रस्तांशी चंद्रकांत पाटील यांनी साधला संवाद

धरणग्रस्तांशी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फोनद्वारे साधला संवाद, १९ मे ला बैठक बोलावून तोडगा काढण्याचे दिले आश्वासन, आमदार सुनील शेळके यांनीदेखील धरग्रस्तांची कैफियत मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: March of maval pavana dam victims pimpri chinchwad water off kjp 91 ssb
First published on: 09-05-2023 at 14:12 IST