पिंपरी- चिंचवड: शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक दिवसांच लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. जगद्गुरू संत तुकोबांच दर्शन घेऊन रोहित पवारांनी उपोषणाला सुरुवात केली. रोहित पवारांसोबत वारकरी आघाडीचे प्रमुख दत्ता महाराज दोन्हे पाटील हे देखील उपोषणाला बसले आहेत.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जनावरांसह, शेती वाहून गेली आहे. घरात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. यातून शेतकरी बाहेर निघावा म्हणून राज्य सरकारने ३२ हजार कोटींचा पॅकेज जाहीर केलं होतं. यावरून राजकारण सुरू झालं आहे. शेतकऱ्यांच सरसकट कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी आता आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

जगद्गुरू संत तुकोबांच्या प्रवेशद्वारा समोर रोहित पवार यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज कर्जमाफी योजनेचा प्रस्ताव रोहित पवार सरकार ला देणार आहेत.

शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करण्यात यावी ही पक्षाची आग्रही मागणी आहे. अस रोहित पवार म्हणाले आहेत. उपोषणदरम्यान रोहित पवार हरिनामाच्या गजरात रमून गेल्याच देखील पाहायला मिळालं. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी त्या काळी शेतकरी संकटात आल्यानंतर कर्जमाफी केली होती.