पुणे शहरातील ऐतिहासिक पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिर आहेत.त्या मंदिर परिसरात दर्ग्याच अतिक्रमण राज्य सरकार मार्फत हटविण्यात यावे.अशी मागणी मनसेचे राज्य सरचिटणीस अजय शिंदे यांनी केली आहे. पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिराचा मुद्दा नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत देखील भाजप आणि महाविकास आघाडीकडून उपस्थित केला होता. त्या निवडणुकीत काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहे.त्यामुळे त्यांच्याकडून मंदिराच्या भूमिके बाबत काय अपेक्षा आहेत.
त्या प्रश्नावर अजय शिंदे म्हणाले की, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारामध्ये पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या ठिकाणी मंदिर नसून दर्गाच आहे.मी तुमच्या मशिदी बांधण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल,असा प्रचार (आमदार रवींद्र धंगेकर) हे करीत होते.तसेच निवडणुकीत विजयी झाल्यानंतर हिरवा गुलाल उधळण्यात आला.त्यामुळे कोणत्याही हिंदू धर्मीयांनी महाविकास आघाडीच्या आमदारांकडून (आमदार रवींद्र धंगेकर)अपेक्षा ठेवल्या नाही पाहिजे असल्याच सांगत आमदार रवींद्र धंगेकर यांना त्यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
तसेच ते पुढे म्हणाले की,जर त्यांना मंदिराबाबत काही पुरावे पाहिजे असतील.तर मी त्यांना देऊ इच्छितो.त्याच बरोबर ते ज्या भागात राहतात त्याचा त्यांनी थोडासा अभ्यास केला पाहिजे.त्यानंतर त्यांच्या निश्चित लक्षात येईल की,तिथे मंदिराच होती.अशा शब्दात आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर अजय शिंदे यांनी निशाणा साधला.