scorecardresearch

Premium

पुण्यातील मावळ, शिरूर लोकसभा मनसे लढवणार; उमेदवार राज ठाकरे ठरवणार!

पुण्याच्या मावळ लोकसभेसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केलेली आहे. स्वतः मावळ लोकसभेवर राज ठाकरे हे लक्ष केंद्रित करून आहेत, अशी माहिती मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस रणजीत शिरोळे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Maval Lok Sabha mns
पुण्यातील मावळ, शिरूर लोकसभा मनसे लढवणार; उमेदवार राज ठाकरे ठरवणार! (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुण्याच्या मावळ लोकसभेसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केलेली आहे. स्वतः मावळ लोकसभेवर राज ठाकरे हे लक्ष केंद्रित करून आहेत, अशी माहिती मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस रणजीत शिरोळे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मराठी माणसाचा दिल्लीत आवाज पोहोचवण्यासाठी मनसे महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील काही लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार आहे. पैकी मावळ आणि शिरूर लोकसभेवर मनसेने लक्ष केंद्रित केलं असून उमेदवार हे राज ठाकरे ठरवतील, असं रणजित शिरोळे यांनी म्हटले.

हेही वाचा – आरक्षणासाठी मराठा सेवा संघ आक्रमक; दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींना धडा शिकविण्याचा निर्धार

Sangli Mahayuti
सांगलीत महायुतीतच मैत्रीपूर्ण लढती ?
Ajit Pawar on Jarange
मराठा आरक्षणाबाबत अधिसूचना निघाल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काल रात्रीपर्यंत…”
Nashik Thackeray group Shivsena
अधिवेशनाचा नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला राजकीय फायदा किती ?
24 crores contract associate BJP
भाजपच्या निकटवर्तीयाला दिले २४ कोटींचे कंत्राट; कोण आहे ही व्यक्ती? माहितीच्या अधिकारातून तपशील समोर

हेही वाचा – चंद्रकांत पाटील म्हणतात, ‘मी पुण्याचा सहपालकमंत्री!’

मनसेचे राज्य सरचिटणीस रणजीत शिरोळे म्हणाले, मनसेची एकला चलो रे ही भूमिका सुरुवातीपासूनच आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील काही मतदारसंघांवर राज ठाकरे यांनी लक्ष केंद्रित केलेल आहे. मावळ लोकसभेची जबाबदारीदेखील मनसेने घेतली असून मनसे मावळ लोकसभा निवडणूक लढवणार आहे. मावळ लोकसभा लढवणार हे निश्चित आहे. उमेदवार कोण असणार हे राज ठाकरे ठरवतील. उरण, पनवेल, कर्जत, मावळ, चिंचवड, पिंपरी असा मावळ लोकसभा मतदारसंघ आहे. मावळ लोकसभा हा भिन्न विचारांचा मतदारसंघ आहे. प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे कुठल्या एका मुद्द्यावर ही निवडणूक होणार नाही. मराठी माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे या मागची ही भूमिका आहे. महाराष्ट्रात ४८ खासदार आहेत. परंतु, महाराष्ट्राची ठाम भूमिका मांडताना दिसत नाहीत. पक्ष हित पहिले मग जनता अशा पद्धतीची खासदारांची स्थिती आहे. अनेक खासदारांच्या मागे सीबीआय, ईडी लागलेली आहे, असेही त्यांनी म्हटलं. शिरूर लोकसभेवरही लक्ष केंद्रित केलंय. शिरूर लोकसभादेखील लढणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns to contest maval shirur lok sabha seats in pune raj thackeray will decide the candidate kjp 91 ssb

First published on: 06-10-2023 at 10:42 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×