लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: कात्रज भागातील आंबेगाव परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले. आतापर्यंत शहरातील २७ गुंड टोळ्यांवर कारवाई झाली आहे.

प्रेम अंकुश शिंदे (वय २३,रा. वेताळनगर, आंबेगाव बुद्रुक, मूळ रा. खरीव, ता. वेल्हा, जि. पुणे), गणेश उर्फ भावड्या बाबू ओव्हाळ (वय २४, रा. जय शिवाजी चौक, आंबेगाव बुद्रुक), भिमश्या सुरेश मुडावत (वय १९, रा. रचना हाईट, आंबेगाव बुद्रुक), करण रवी पटेकर (वय २०, रा. बालाजी पार्क समोर, नऱ्हे) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.

आणखी वाचा-पुणे: ठेकेदाराची अडवणूक करणारे दोन पोलीस निलंबित

प्रेम शिंदे हा टोळीप्रमुख आहे. त्याने साथीदारांशी संगमनत करुन भारती विद्यापीठ, आंबेगाव भागात दहशत माजविली होती. या टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंढणी उकळणे, दहशत माजविणे, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टोळीप्रमुख शिंदे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पुराणिक, उपनिरीक्षक वैभव गायकवाड, चंद्रकांत माने, नरेंद्र महांगरे, महेश बारवकर, विशाल वारुळे यांनी तयार केला होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील २७ गुंड टोळ्यांवर कारवाई केली आहे. सहायक आयुक्त नारायण शिरगावकर तपास करत आहेत.