पुणे : शरद पवार ठरवतील तेच तोरण, धोरण आणि समाजकारण करणार आहे. वेळ उरलाच तर निवडणुकीपुरते राजकारण करणार, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असल्याची ग्वाही रविवारी पुण्यात दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठानने तयार केलेल्या ‘शिवराज्याभिषेक : भारताच्या इतिहासातील असामान्य घटना’ या ग्रंथाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी पाटील बोलत होते. ग्रंथाचे मुख्य संपादक डॉ. सदानंद मोरे यांना शिवराज्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. खासदार श्रीनिवास पाटील, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, प्रतिभा पवार, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल निवृत्ती पवार या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा – शिवछत्रपतींचे राज्य हे रयतेचे; शरद पवार यांचे प्रतिपादन

हेही वाचा – पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला केलं जेरबंद; ३ पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे जप्त

पाटील म्हणाले, की शरद पवार यांच्यामुळे मी पुण्यात जिल्हाधिकारी म्हणून आलो. शिवरायांचा इतिहास पुण्यात जवळून पाहता आला. भक्ती आणि शक्ती यांचा संगम असलेले भक्तीशक्ती शिल्प उभारणीचे काम आमच्या हातून घडले. त्याचे उद्घाटनही पवार यांच्या हस्ते झाले. आता शरद पवार ठरवतील, तेच आमचे तोरण आहे. त्याचबरोबर तेच आमचे धोरण आणि समाजकारण आहे. यातून वेळ उरलाच तर निवडणुकीपुरते राजकारण करणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp shrinivas patil made a statement on sharad pawar in pune pune print news stj 05 ssb
First published on: 27-08-2023 at 21:15 IST