महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२० या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेतील काही प्रश्न वगळल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्याविरोधात आज (२ मे) पुण्यातील अलका टॉकीज चौकात एमपीएससी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२० या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेतील काही प्रश्न वगळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी तिसऱ्या उत्तरतालिका आणि मुंबई, औरंगाबाद, नागपूर न्यायालयात याचिका दाखल केली. मुंबई मॅटने एमपीएससीच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर पुन्हा १७ फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

गेल्या दोन महिन्यात यावर एकही सुनावणी झालेली नाही. या सुनावणीच्या प्रतिक्षेत विद्यार्थी आहेत. पुढील महिन्यापासून न्यायालयाला सुट्ट्या लागणार आहे. त्यामुळे बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या काय?

आयोगाने जे प्रश्न बरोबर होते ते बरोबर द्यावेत, फेर निकाल लावून परीक्षा लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा : सामान्य अध्ययन पेपर क्र. २ अर्हताकारी करण्याचा निर्णय

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक २ (CSAT) हा अर्हताकारी (Qualifying) करण्याचा निर्णय आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी घेतला आहे.

हेही वाचा : MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; ‘असा’ करता येईल अर्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक २ (सी- सॅट) हा अर्हताकारी होण्यासाठी किमान ३३ टक्के गुणांची अट अर्हता प्राप्त करण्यासाठी विहित करण्यात आली आहे. या पेपरमध्ये किमान ३३ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक १ मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.