पिंपरीः चिंचवडमध्ये सराईत गुन्हेगाराचा खून; १८ जणांच्विरूद्ध गुन्हा दाखल|murder of criminal in chinchwad a case has been registered against 18 persons crime pcmc police pune | Loksatta

चिंचवडमध्ये सराईत गुन्हेगाराचा खून; १८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

पूर्ववैमनस्य आणि र्वॉशिंग सेंटरच्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चिंचवडमध्ये सराईत गुन्हेगाराचा खून; १८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

पिंपरीः हवेत गोळीबार करत भर चौकात कोयत्याने वार करून सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आल्याची घटना चिंचवडला घडली आहे. या प्रकरणी १८ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्य आणि र्वॉशिंग सेंटरच्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

विशाल नागू गायकवाड (वय- ३८, मोरे वस्ती, चिखली) असे मयताचे नाव आहे. त्याच्या खूनप्रकरणात विशाल कांबळे, राजू कांबळे, सिध्द्या कांबळे, मिलींद कांबळे, विशाल लष्करे, करण उर्फ ससा, चैतन्य जावीर, ओमकार शिंदे, यश कुसाळकर, रोहित मांजरेकर, सूरज मोहिते, निलेश लष्करे, बालाजी कोकाटे, मोहन विचटकर यांच्यासह तीन अनोळखी व एक अल्पवयीन आरोपी असे मिळून १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहुतांश आरोपी चिंचवड परिसरातील आहेत.

हेही वाचा: प्रेमप्रकरणाच्या संशयातून महाविद्यालयीन युवकाचे अपहरण, मारहाणीत युवक गंभीर जखमी; दोघे अटकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल गायकवाडचा वॉशिंग सेंटरचा व्यवसाय होता. आरोपींचे आणि विशालचे जुने भांडण असून व्यवसायावरूनही वाद आहेत. शुक्रवारी रात्री चिंचवडच्या परशुराम चौकात विशाल थांबला होता. तेव्हा आरोपींनी हवेत गोळ्या झाडून दहशत निर्माण केली आणि कोयत्याने वार करून विशालचा खून केला. त्यानंतर, आरोपी दुचाकीवरून पसार झाले. आरोपींचा कसून शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. चिंचवडचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ पुढील तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 16:33 IST
Next Story
अपंगांना स्वावलंबी बनवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेची कौशल्य प्रशिक्षण योजना