पुणे : शेतकरी, कामगार, दलित, अल्पसंख्य आणि गरिबांच्या मागण्यांचे आपणच प्रवक्ते आहोत, असा कांगावा करीत खरा चेहरा लपवायचा आणि हिंसाचार करायचा ही डाव्यांची वस्तुस्थिती आहे. पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळ या राज्यांचा त्यासाठी त्यांनी प्रयोगशाळा म्हणून वापर केला. नक्षलवाद हाच डाव्यांचा विघटनवादी चेहरा आहे, असे मत राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी शनिवारी व्यक्त केले.

विवेक विचार मंच, लोकशाही जागर मंच आणि राजे शिवराय प्रतिष्ठान यांच्या वतीने भाजप नेते माधव भंडारी लिखित ‘डाव्यांचा खरा चेहरा’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते झाले.  विचार मंचाचे अध्यक्ष प्रदीप रावत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दीक्षित म्हणाले, की डावे हे खोटारडे, विश्वासघातकी असून टोकाची असहिष्णूता आणि कंपूशाही करणारी जमात आहे. रशिया आणि चीनला डोळय़ासमोर ठेवत भारतातील त्यांचे अनुयायी स्वत:ला डावे म्हणवतात. डाव्यांचा हिंसाचार कसा असतो याची गडचिरोली आणि दंडकारण्य ही ठळक उदाहरणे आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणासाठी इंग्लंडला गेलेले पूर्ण कम्युनिस्ट होऊन भारतात आले. प्रशासकीय सेवेत काम करताना लोकांच्या विरोधी धोरणे करण्यात त्यांनी धन्यता मानली. बस्तर या वनवासी जिह्यात बाहेरच्यांना जायला मनाई असली, तरी मिशनऱ्यांना मुक्तद्वार होते. दलित आणि आदिवासी महिला हे नक्षल्यांचे लक्ष्य आहे. लोकशाहीने वाटचाल करणाऱ्या भारताचा विनाश आणि चीनच्या धोरणांना पाठिंबा देत भारताला विरोध हाच डाव्यांचा कार्यक्रम आहे. कोरेगाव-भीमा संदर्भात जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास प्रसृत करण्यात आला. हिंसक मार्गाने सत्ता परिवर्तन घडवून आणायचे हेच डाव्यांचे धोरण आहे, असे रावत यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. भंडारी यांनी लेखनामागची भूमिका स्पष्ट केली.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
sonam wangchuk china march
सोनम वांगचुक यांचा मोठा दावा; म्हणाले, “चीननं भारताचा मोठा भूभाग…”
Navneet Rana nominated for Amravati Lok Sabha Constituency
नवनीत राणा हिंदुत्वाच्या राजकारणावर स्वार