कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. कोथरूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देत आहे. बोलघेवडे पोपट ‘ईडी’च्या तालावर नाचू लागले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे: दहावी-बारावीच्या परीक्षार्थींना दहा मिनिटांचा वाढीव वेळ

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपच्या पदयात्रेत सहभागी होणार नसले तरी पाठिंबा मात्र भाजप उमेदवाराला असणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील मनसेची ताकद पाहता मनसेच्या या निर्णयामुळे भाजपला पोटनिवडणुकीत राजकीय फायदा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसने मनसेवर टीका केली आहे.

हेही वाचा >>>पुणे: बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचा छापा

दुसऱ्याच्या वरातीमध्ये सुपारी घेऊन किती दिवस नाचणार ? कधीतरी तुम्हीही घोड्यावर बसा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी समाजमाध्यमातून मनसेवर टीका केली आहे. यासंदर्भात बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, ऑक्टोबर २०१९ मधील विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जोरावर किंबहुना पाठिंब्यावरच मनसेने उमेदवार दिला होता. मनसेचे तेव्हाचे उमेदवार ॲड. किशोर शिंदे यांनी भाजपचे चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या जोरावरच कडवी लढत दिली होती. कोथरूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देत आहेत. ‘ईडी’च्या धाकामुळेच मनसे भाजपच्या तालावर नाचत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp criticizes maharashtra navnirman sena decision to support bharatiya janata party candidate pune print news apk 13 amy
First published on: 15-02-2023 at 17:40 IST