पुणे : भाजपचे नेते आमदार पडळकर यांनी जतमध्ये बोलताना शरद पवार गटाचे जेष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्याबाबत काही दिवसापूर्वी आक्षेपार्ह विधान केल्याची घटना घडली होती.त्या विधानावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.त्या विधानाबाबत भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले,गोपीचंद पडळकर यांच्या विधानाच माझ्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,चंद्रशेखर बावनकुळे,सदाभाऊ खोत तसेच यांच्यासह कोणत्याही नेत्यांनी समर्थन केलेल नाही.
त्या विधानानंतर गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी,त्यांची आई, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आणि त्यांची मुलगी या सर्वावर तुम्ही बोलता,हे तुम्हाला चालत का ? त्यावेळी तुम्ही फिल्डवर का नाही उतरला असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तसेच ते पुढे म्हणाले, मी गोपीचंद पडळकर यांच् समर्थन करीत नाही.त्यांनी ती भाषा वापरु नये,महाराष्ट्राची ही संस्कृती नाही.गोपीचंद हा आमचा अज्ञानधारक कार्यकर्ता आहे.देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनांमुळे उद्यापासून गोपीचंद पडळकर यांच्या देहबोली आणि भाषेमध्ये फरक दिसेल,अशी भूमिका मांडत.आता यापुढील काळात अशी कोणीच भाषा वापरु नये असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.