अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर केल्याची घटना ताजी असताना पुण्यातील भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर केली. त्यानंतर राज्यातील अनेक भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिच्या अटकेची मागणी करून कडक कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्याच दरम्यान पुण्यातील भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी देखील शरद पवार यांच्या बद्दल आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे समोर आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेव्हा पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते गणेश नलावडे, दिपक पोकळे,रोहन पायगुडे,अजिंक्य पालकर,दीपक जगताप, संतोष जोशी, आप्पा जाधव,राजेंद्र अलमखाने,प्रसाद गावडे यांनी विनायक आंबेकर यांना त्या पोस्ट बद्दल जाब विचारला. दरम्यान एका कार्यकर्त्यांनी विनायक आंबेकर यांच्या कानाखाली मारली, त्यानंतर सर्व तेथून कार्यकर्ते निघून गेले. या घटनेची माहिती भाजप कार्यकर्त्यांना मिळताच सर्व जण फडगेट पोलिस चौकीमध्ये पोहचले, संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.