पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात वाहतूक संथ गतीने सुरू आहे. न्यू- इयर सेलिब्रेशन आणि विकेंड यामुळे द्रुतगती महामार्गावर वाहतूक संथगतीने सुरू आहे. लोणावळा, महाबळेश्वर या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना पुणे- मुंबई द्रुतगती मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे अनेक वाहने रस्त्यावर आल्याने वाहतूक संथगतीने सुरु आहे . बोरघाटात महामार्ग पोलिस रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत.

सावधान..!”थर्टी फर्स्ट’च्या बंदोबस्तासाठी २५०० पोलीस अधिकारी, कर्मचारी सज्ज !; गुन्हे दाखल करणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकेंड आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी अनेक नागरिक घराबाहेर पडले आहेत. पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळा, महाबळेश्वर अशा ठिकाणी जाण्यासाठी बहुतांश जण पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गाचा वापर करतात. यामुळेच द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात वाहतूक संथ गतीने सुरू आहे. महामार्ग पोलिस वाहतूक सुरळीत करत असून अवजड आणि हलकी वाहने अशी वेगवेगळी करत आहेत. अनेकदा बोरघाटात लेन तोडून वाहन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला जातो.