पुणे : दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात रेल्वेगाडीखाली उडी मारुन नवविवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. आदित्य ओव्हाळ (वय २४, रा. आंधळगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यचे दौंड तालुक्यातील पारगाव येथे ओैषध विक्रीचे दुकान आहे. त्याचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता.

हेही वाचा >>> गडचिरोलीमधील भाजपचे नेते वासुदेव बट्टे यांच्या मुलीची पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या, नैराश्यातून आत्महत्या केल्याची  शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केडगाव परिसरात लोहमार्गावर आदित्यने रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास इंद्रायणी एक्सप्रेस रेल्वेगाडी खाली उडी मारुन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. नवविवाहित आदित्यने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आंधळगाव, पारगाव परिसरातील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.