लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: ईस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (आयएसकेपी) प्रकरणातील दोन संशयितांशी संबंधित चार ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणेने छापेमारी केली. यात पुणे येथे तलहा खान याच्या घरी, तर मध्यप्रदेशमधील सीवोनी येथे अक्रम खान याच्या घरी शोधमोहीम राबविण्यात आली आहे.

Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
BJP, Jats, Thakurs, anger of the Jats ,
पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला जाट, ठाकुरांच्या रागाची धास्ती
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…
bjp target to cross 70 lok sabha seat in up
Lok Sabha Elections 2024 : उत्तर प्रदेशमध्ये ‘सत्तर पार’च्या लक्ष्यासाठी भाजपची धडपड

दिल्लीतील ओखला, जामिया येथून काश्मिरी जोडपे जहांजैब सामी वानी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग यांना अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हे जोडपे आयएसकेपीशी संलग्न असल्याचे तपासात समोर आले. तसेच, एनआयएकडून तपास सुरु असलेल्या अन्य एका प्रकरणातील तिहार कारागृहात असलेल्या आरोपी अब्दुल्ला बशीथ याचाही त्यांच्याशी संबंध समोर आला.

आणखी वाचा- लोहगाव विमानतळावर महिला अधिकाऱ्याच्या अंगठ्याचा चावा घेणारी प्रवासी तरुणी अटकेत

एनआयएने त्याच दिवशी शिवमोग्गा आयएस षडयंत्रप्रकरणात सीवोनी येथील तिन ठिकाणी अब्दुल अजीज सलाफी आणि शोएब खान या संशयितांच्या घर आणि कार्यालयांच्या ठिकाणी झडती घेतली.

शिवम्मोगा प्रकरणात, परदेशातून रचलेल्या कटाचा एक भाग म्हणून आरोपी मोहम्मद शारिक, माझ मुनीर खान, यासीन आणि अन्य आरोपींनी परदेशात असलेल्या त्यांच्या हँडलरच्या सूचनेनुसार गोदामे, दारुची दुकाने हार्डवेअरची दुकाने, वाहने आणि विशिष्ट समुदायाच्या सदस्यांच्या मालमत्ता अशा सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांना लक्ष्य केले होते. यात जाळपोळ आणि तोडफोडीच्या २५ हून अधिक घटना घडल्या. यात त्यांनी एक मॉक आयईडी स्फोटही केला होता. यासाठी ऑनलाइन हँडलरद्वारे क्रिप्टो-करन्सीच्या माध्यमातून निधी दिला जात होता.