पुणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वानवडी छत्रीजवळील जल वितरण नलिकेची दुरुस्ती करण्याचे काम येत्या मंगळवारी (७ फेब्रुवारी) करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे छावणी परिसरासह काही भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे.
हेही वाचा >>> पुणे: दहावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे सोमवारपासून उपलब्ध
दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी (८ फेब्रुवारी) सकळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरठा विभागाकडून कळविण्यात आले आहे. संपूर्ण पुणे छावणी परिसर, कमांड हॉस्पिटल परिसर, लष्कर भाग, वानवडी गावठाण, एसआरपीएफ परिसर, एसव्ही नगर, काळूबाई मंदिर परिसर, सोलापूर रस्ता, सोपानबाग, उदयबाग, डोंबरवाडी, बी. टी. कवडे रस्ता, भीमनगर, भारत फोर्ज कंपनी परिसर आणि घोरपडी येथील पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे.