पिंपरी : मंजूर रजा कालावधी संपल्यानंतरही विना परवाना गैरहजर राहणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन सहाय्यक आयुक्तांना आयुक्त शेखर सिंह यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. २४ तासाच्या आत कर्तव्यावर रुजू व्हावे. अन्यथा शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला आहे.

पिंपरी महापालिकेत प्रतिनियुक्तीवर असलेले उपजिल्हाधिकारी संवर्गातील निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर आणि आकाश चिन्ह व परवाना विभागाचे प्रशांत जोशी हे जबाबदारीच्या पदावर कार्यरत आहेत. दोघेही मागील तीन महिन्यांपासून बदलीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी सातत्याने रजेवर जात आहेत. खांडेकर यांनी वैयक्तीक कारणास्तव २१ मार्च ते १३ एप्रिल २०२३ या कालावधीत रजा घेतली. परंतु, रजा कालावधी संपून १३ दिवस झाले. तरी, खांडेकर अद्यापही रुजू झाले नाहीत. तर, जोशी हे १७ ते २१ एप्रिल दरम्यान रजेवर होते. रजा कालावधी संपून पाच दिवस उलटून तेही रुजू झाले नाहीत.

हेही वाचा >>> पुणे : विहिरीत पडून सहा वर्षांच्या बालकाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोघांनीही अनुउपस्थितीबाबत कोणतेही पूर्वकल्पना दिली नाही. कामावर रुजू झाले नसल्याने कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे आयुक्त सिंह यांनी दोघांनाही कारणे दाखव नोटीस बजाविली. नोटीस मिळाल्यापासून २४ तासाच्या आत कर्तव्यावर रुजू व्हावे. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, भूमी आणि जिंदगी विभागाचे उपायुक्त सचिन ढोले, ह क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकारी सुषमा शिंदे हे दोघेही रजेवर आहेत. विभाग चांगला मिळाला नसल्याने दोघे रजेवर गेले असल्याची महापालिका वर्तुळात चर्चा आहे.