पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहाची सर्व सुरक्षा भेदत एका कैद्याने पलायन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आशिष जाधव असं या कैद्याचे नाव असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या टीम रवाना झाल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००८ मध्ये वारजे माळवाडी येथील एका व्यक्तिचा आशिष जाधव याने खून केला होता. त्या प्रकरणी आरोपी आशिष जाधव येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. पण दरम्यानच्या काळातील आशिष जाधव याचे कारागृहातील वर्तन पाहून रेशन विभागात काम देण्यात आले होते.

हेही वाचा… Maharashtra News Live : “आदित्य ठाकरे आणि नरेंद्र मोदींचा ब्रँड एकच”, भाजपाने शेअर केलेल्या फोटोवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काल दुपारच्या सुमारास सर्व कैद्याची मोजणी करण्यात आली. त्यावेळी त्यामध्ये आरोपी आशिष जाधव दिसून आला नाही. त्यावर कारागृहातील सर्व ठिकाणी पाहिले असता आरोपी आशिष जाधव दिसून आला नाही. तो पळून गेल्याच निश्चित झाल्यावर आरोपीच्या शोधासाठी टीम रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात आले.