पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघासाठी पोट निवडणूक जाहीर झाल्यानंतर या जागेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने दावा केला आहे. कसब्यात शिवसेनेची मोठी ताकद असून तुल्यबळ उमेदवारही आहेत. भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीमध्ये शिवसेनेच्या ताकदीचाच भाजपला फायदा झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून पोटनिवडणुकीला सामोरे जाताना शिवसेनेचा या मतदारसंघासाठी पर्याय ठरू शकतो, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघासाठी पोटनिbaवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार, याबाबत सध्या चर्चा सुरू झाली आहे. या परिस्थितीत शिवसेनेनेही कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा… ‘चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवावी’, स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसची आक्रमक भूमिका; अंतिम निर्णय सोपवला वरिष्ठांवर

सन २०१४ चा अपवाद वगळता लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने युती म्हणून लढविली. त्याचा नेहमी फायदा भारतीय जनता पक्षाला झाला. शिवसेनेचा कसबा हा बालेकिल्ला आहे. पक्षाची मोठी ताकद आणि संघटनात्मक जाळे या मतदारसंघात आहे. त्याचा फायदा शिवसेनेला होईल. कसबा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेचा धनुष्यबाण मतदारसंघातील घरोघरी पोहोचविता येईल, ही बाब पक्ष नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिली आहे. मतदारसंघातील पक्षाची वाढती ताकदीचे गणितही मांडण्यात आले आहे. त्यामुळे कसबा मतदारसंघ अन्य कोणत्याही पक्षापेक्षा शिवसेनेसाठीची योग्य पर्याय आहे, अशी आग्रही मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.

हेही वाचा… पुणे : बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर पेट्रोल ओतून पेटविण्याचा प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोटनिवडणुकीतील उमेदवारीबाबतचा सर्व निर्णय पक्ष प्रमुख घेतील. तो निर्णय मान्य असेल. मात्र कसब्यातून निवडणूक लढविण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आल्याचेही संजय मोरे यांनी स्पष्ट केले. कसबा विधानसभा पोट निवडणूक जाहीर होताच काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणूक लढविण्याच्या विचारात आहे.