पुणे : पुणे – मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर ओव्हरहेड ग्रँटी बसवण्यासाठी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, हे काम अवघ्या काही ४० मिनिटांमध्ये झाल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. किवळे पासून जुन्या पुणे- मुंबई महामार्गाने ही वाहतूक वळवण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून अशाच प्रकारची कामे करण्यासाठी पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर अनेकदा ब्लॉक घेण्यात आलेला आहे.
हेही वाचा : पुणे : गावांचे पालटले रूप! पाबळ परिसरारील ११४ गावे झाली स्वयंपूर्ण
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर आज बारा ते दोनच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात आला होता. किवळे या ठिकाणाहून अवजड आणि हलकी वाहने जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर वळवण्यात आली होती. ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या (किलोमीटर ७४/९००) महामार्गावर युद्ध पातळीवर काम करत ओव्हरहेड ग्रँटी बसविण्यात आली. मुळात दोन तासांचा ब्लॉग असताना अवघ्या काही मिनिटांमध्ये ही ग्रँटी बसवण्यात आली. यामुळे पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झालेली आहे.