पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांना यंदाचा ‘उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार’ जाहीर झाला आहे. महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या मंगळवारी (३ सप्टेंबरला) या पुरस्काराचे वितरण होणार असून मुंबई विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हा कार्यक्रम पार पडेल. २० वर्षांपूर्वी दिवंगत मंत्री गिरीश बापट यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर पुण्याचे उपनगर अशी ओळख असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडून येऊन पहिलाच ट्रम्प हा पुरस्कार मिळविणारे चेतन तुपे हे पहिलेच आमदार ठरले आहेत.

हेही वाचा – खराडीतील नदीपात्रात सापडलेल्या महिलेची मृतदेहाची ओळख पटली, संपत्तीच्या वादातून सख्खा भाऊ आणि वहिनीने केला खून

हेही वाचा – पुणे : डॉक्टर महिलेचा विनयभंग करणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधिमंडळाच्या कामकाजातील नियमित सहभाग, संसदीय परंपरा, शिष्टाचार यांची जाण, विधिमंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन, उपस्थिती, विधिमंडळात प्रश्न, विषय मांडताना वापरलेले कौशल्य, वक्तृत्व शैली, संसदीय भाषणे या सगळ्या बाबी पडताळून या पुरस्कारांसाठी नेमलेल्या तज्ञ समितीकडून संबधित आमदाराची यासाठी शिफारस केली जाते. त्यानंतर राष्ट्रकुल संसदीय मंडळाकडून हे पुरस्कार जाहीर केले जातात. यापूर्वी हा पुरस्कार दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, रोहिदास पाटील, अरुण गुजराथी यांना देण्यात आलेला आहे.