पिंपरी- चिंचवडच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल ५ लाख ४० हजारांच मेफेड्रोन ड्रग्स जप्त केलं आहे. शहजाद आलाम अब्बास कुरेशी (वय-३८) अस ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मेफेड्रॉन ड्रग्स मुंबईतील रिझवान चाँदीवालाकडून आणल्याचं तपासात समोर आलं आहे.

हेही वाचा… पिंपरी : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महापालिका आयुक्तांना नोटीस, काय आहे प्रकरण?

policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…
police committed suicide
खडक पोलीस ठाण्यात पोलीस शिपायाची बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या
Fugitive accused in Mephedrone smuggling case is arrested
आईला भेटायला आला अन् जाळ्यात अडकला; मेफेड्रोन तस्करी प्रकरणात फरार आरोपीला अटक
Panvel, ganja seized
पनवेलमध्ये तरुणाकडून एक किलो गांजा जप्त

हेही वाचा… बारावीची परीक्षा उद्यापासून… कॉपी रोखण्यासाठी काय तयारी?

पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ड्रग्स तस्करी विरोधात कारवाई केली असून आरोपीकडून दहा लाखांची महागडी चारचाकी गाडी असा एकूण १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना पुणे- मुंबई महामार्गावर अज्ञात व्यक्ती मेफेड्रोन घेऊन येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.