पुणे : समाजमाध्यमातून झालेल्या ओळखीतून एका तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका ३२ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक आणि पीडित तरुणीची २०२३ मध्ये समाज माध्यमात ओळख झाली होती. ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंंबंध निर्माण झाले. उपनिरीक्षकाने तिला विवाहाचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. विवाहाबाबत तरुणीने विचारणा केली. त्यानंतर त्याने शिवीगाळ करुन तरुणीला मारहाण केली, तसेच धमकीही दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश खांडे तपास करत आहेत.