फरार असलेल्या आरोपीचा सिनेस्टाईल पाठलाग करुन महाकाली टोळीतील गुंडाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चार गावठी बनावटीच्या पिस्तुल आणि चार काडतुसंही जप्त करण्यात आली आहे. सागर कुमार इंद्रा असं अटक करण्यात आलेल्या गुंडाचं नाव आहे.  त्याच्यावर पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो हडपसर येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून हिंजवडीमधील अपहरण गुन्ह्यात तो फरारही होता. आता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी सागर हा सराईत गुन्हेगार आहे. तो पिंपरी-चिंचवड पोलिसांना गेल्या काही दिवसांपासून हवाच होता. त्यानुसार त्याचा शोध पोलीस घेत होते. तेव्हा, हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अतिक शेख यांना माहिती मिळाली की, आरोपी सागर हा घोटावडे येथून हिंजवडीकडे येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या मार्गदशनाखाली दोन पथक तयार करण्यात आले. हिंजवडीच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात आली. दरम्यान, एक दुचाकीस्वार संशयितरित्या आला, पोलिसांनी आरोपी सागर असल्याचे ओळखले, मात्र त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केला. पोलिसांनी हार मानली नाही. त्याचा फिल्मीस्टाईल पाठलाग करत ताब्यात घेतले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता चार पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे मिळाली जी पोलिसानी जप्त केली आहेत. सागर हा महाकाली टोळीतील गुंड आहे.  त्याच्यावर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर ची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक अनरुद्ध गिजे, मिनीनाथ वरुडे, पोलीस कर्मचारी विवेक गायकवाड, महेश वायबसे, किरण पवार, नितीन पराळे, हनुमंत कुंभार, आतिक शेख, कुणाल शिंदे, सुभाष गुरव, चंद्रकांत गडदे, अमर राणे, झनक गुमलाडू, विकी कदम, अली शेख, आकाश पांढरे, रितेश कोळी यांच्या पथकाने केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri police arrested absconding theft of mahakali gang scj
First published on: 23-09-2019 at 21:49 IST