Pit Bull Attacks Boy: गेल्या काही दिवसांमध्ये पिटबुल जातीच्या कुत्र्याने आपल्या मालकांवर किंवा अनोळखी व्यक्तिंवर हल्ला केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतं आहे. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गाडीवर जाणाऱ्यांचा पाठलाग असो, किंवा रस्त्यावरून जात असाल तरीही भटके कुत्रे हे टोळीने हल्ला करत आहे. शांतता असेल आणि एखादी व्यक्ती किंवा लहान मुलं एकटी असली की कुत्रे त्यांचेच राज्य असल्याप्रमाणे हल्ला करतात. यात आजवर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्यांचे माणसांवर हल्ला चढवण्याचे हे प्रमाण जास्त वाढत आहे. अशातचं आता दिल्लीतील गाझियाबादमध्ये एका १५ वर्षीय मुलावर पिटबुलने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला घराबाहेर खेळत असताना अचानक तिकडे पिटबुल आला आणि चिमुकल्यावर हल्ला केला. व्हिडिओमध्ये दिसून येते की, कुत्र्याने मुलावर कसा हल्ला केला आणि त्याला ओरबाडण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामध्ये अक्षरश: हा मुलगा खाली कोसळतो. आजूबाजूला यावेळी मदतीसाठीही कुणी पुढे येताना दिसत नाहीये. आश्चर्याची बाब म्हणजे तेथे काही लोक उपस्थित होते जे या मुलाला मदत करू शकले असते, पण ते फक्त समोर कुत्र्याने केलेला हल्ला बघत राहिले. चिमुकला स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न करताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
या मुलाची प्रकृती चिंताजनक असून या हल्ल्यानंतर मुलाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> शेतकऱ्याचा नाद नाही! वावरात आलेल्या बिबट्यासोबत घेतली सेल्फी; VIDEO व्हिडीओ पाहून लोकंही अवाक्
संपुर्ण देशात भटक्या कुत्र्यांची दहशत
दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिसून आली आहे. नुकतेच गुजरात राज्यात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला होता. कुत्र्यांच्या या हल्ल्यात तीन वर्षांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. पायी चालत जाणे किंवा सायकल चालविणाऱ्यांना हे कुत्रे आपले लक्ष्य बनवितात.