पिंपरी – चिंचवड : पोलीसांनी केलेल्या विविध कारवाईमध्ये ५० पिस्तुले आणि ७९ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तसेच धारदार शस्त्र बाळगल्या प्रकरणी देखील कारवाई करण्यात आली आहे. अशा गुन्ह्यातील आरोपींकडून ९१ कोयते आणि १२ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. अशी ११६ धारदार शस्त्रे पोलीसांनी जप्त केली आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड पोलीसांनी १३ ऑगस्ट २०२५ ते ०२ सप्टेंबर २०२५ च्या दरम्यान सर्व पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट यांनी केलेल्या विविध करवाईमध्ये घातक शस्त्र आणि धारदार हत्यार बाळगणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. ही विशेष मोहीम पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीसांनी अवैधरित्या पिस्तुल बाळगणाऱ्या ४० जणांवर गुन्हे दाखल करून ४५ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण ५० पिस्तुले आणि ७९ जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच धारदार शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात पोलिसांनी कारवाई बडगा उगारला आहे. ९४ गुन्हे दाखल करून ६६ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ९१ कोयते, १२ तलवारी असे एकूण ११६ धारदार शस्त्रे जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पिंपरी- चिंचवड पोलीसांनी केली आहे.