पीएमपी बसमध्ये प्रवेश करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ३५ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना हडपसर भागात घडली. याबाबत एका ७४ वर्षीय ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला हडपसर भाजी मंडई परिसरातील थांब्यावर पीएमपी बसमध्ये प्रवेश करत होत्या. त्या वेळी बसमध्ये गर्दी होती. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले.
हेही वाचा >>>Gram Panchayat Election Result 2022: पुण्याच्या मावळमध्ये ६ ठिकाणी राष्ट्रवादीचा डंका; भाजपा तीन ठिकाणी विजयी
सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले तपास करत आहेत. शहरात गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या महिलांकडील दागिने लांबविणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला. गर्दीच्या मार्गावरील बसमध्ये शिरुन प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.