पुण्यात प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या प्रियकराला सहकारनगर पोलिसांनी लातूरमधून अटक केली. त्याच्या तावडीतून दीड वर्षांच्या मुलाची सुखरुप सुटका करण्यात आली. सुनील सोपान पांढरे (वय २६, रा. पांढरेवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत एका २७ वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि पांढरे एकाच कंपनीत काम करीत असल्याने त्यांची ओळख झाली होती. दोघे जण पुणे-सातारा रस्त्यावरील एका लॉजमध्ये मुक्कामाला होते. महिलेबरोबर तिचा दीड वर्षाचा मुलगाही होता. पांढरे आणि महिलेत वाद झाला. तेव्हा पांढरेने महिलेला स्वच्छतागृहात कोंडले आणि तिच्या मुलाला घेऊन तो पसार झाला. महिलेने आरडाओरडा केल्याने लॉजच्या व्यवस्थापकाने तिची सुटका केली.

आरोपी प्रियकराला लातूर येथील एका लॉजमधून पहाटे अटक

या घटनेनंतर पीडित महिलेने तातडीने सहकारनगर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने पांढरेचा शोध सुरू केला. तेव्हा तो एका बसमधून लातूरकडे गेला असल्याची माहिती तपासात मिळाली. पोलिसांनी बसचा पाठलाग सुरू केला. त्याला लातूर येथील एका लॉजमधून पहाटे पकडण्यात आले. त्याच्या तावडीतून मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : पुणे : तोतया पत्रकाराचा पोलीस चौकीत गोंधळ, कारवाई करणाऱ्या पोलिसांना धमकी; आरोपीला अटक

सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे, कर्मचारी बापू खुटवड, महेश मंडलिक, भुजंग इंगळे, महादेव नाळे, सुशांत फरांदे, सागर सुटकर, सागर शिंदे, प्रदीप बेडीसकर आदींनी ही कारवाई केली.