पुणे : गांजा विक्री करणाऱ्या एकाला वाघोली पोलिसांनी अटक केली. वाघोली-लोहगाव रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून पोलिसांनी आठ किलो ४०२ ग्रॅम गांजा जप्त केला. सुरेश साहेबराव पाटील (वय ४४, रा. हिसाळे, ता. शिरपूर, जि. धुळे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

वाघोली-लोहगाव रस्त्यावर पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी पाटील गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून पाटील याला पकडले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत गांजा सापडला. जप्त केलेल्या गांजाची किंमत १ लाख ६९ हजार ३४० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाटील याला न्यायालायने २ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाटील गांजा कोणाला विकणार होता, तसेच त्याने कोणाकडून गांजा आणला, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक निरीक्षक विनायक अहिरे, उपनिरीक्षक मनोज बागल, रामचंद्र पवार, संदीप तिकोणे, प्रदीप मोटे, नामदेव गडदरे, विशाल गायकवाड, समीर भोरडे यांनी ही कारवाई केली.