पुणे : लोणी काळभोर भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या रिक्षाचालक तरुणाला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी १२ किलो गांजा, रिक्षा असा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. लक्ष्मण राजू पवार (वय ३०, वर्षे, रा. यमुनानगर, सिद्धार्थनगर झोपडपट्टी, ओटा स्किम, निगडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
रिक्षाचालक पवार आणि साथीदार रिक्षाताून गांजा विक्रीसाठी लोणी काळभोर भागात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी राहुल कर्डिले यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून थेऊर रेल्वे पुलाजवळ रिक्षाचालक पवार आणि साथीदाराला ताब्यात घेतले. रिक्षाची तपासणी करण्यात आली. तेव्हा रिक्षात ठेवलेल्या पिशवीत गांजा सापडला. आरोपी गांजा कोणाला विक्री करणार होते, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, पोलिस कर्मचारी माने, सातपुते, वणवे, देवीकर पोलीस शिपाई राहुल कर्डीले, सोनवणे, दडस, कुंभार, पाटील, कुदळे, वीर, गाडे, शिरगीरे यांनी ही कारवाई केली.